Jayesh Thaly's Album: Wall Photos

Photo 2 of 2 in Wall Photos

स्वतःच्या स्थूलदेहात साधकांना अडकू न देता थेट ईश्‍वरी तत्त्वाशी जोडणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
30 May 2020
चराचरात ईश्‍वर पहायला शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘परात्पर गुरु डॉक्टरांनी एकदा माझ्या समवेत अन्य राज्यातील एक संतांना भेटवस्तू आणि त्यांच्या शिष्याला प्रसाद पाठवला होता. तो शिष्य त्या संतांची चांगली सेवा करत असल्याने परात्पर गुरु डॉक्टरांनी त्याला प्रसाद पाठवला होता. त्या शिष्याला मी तो प्रसाद परात्पर गुरु डॉक्टरांनी दिल्याचे सांगितल्यावर त्याने नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करून तो प्रसाद स्वीकारला. मला या प्रसंगाचे आश्‍चर्य वाटले आणि मी हा प्रसंग त्या संतांना सांगितला. ते संत म्हणाले, ‘‘तो शिष्य केवळ मला मानतो. त्यामुळे त्याने परात्पर गुरु डॉक्टरांकडून आलेल्या प्रसादाला नकारात्मक प्रतिसाद दिला. पुढच्या वेळी असा खाऊ माझ्या हातात द्या. त्यानंतर मी तो शिष्याला देईन. मग अडचण येणार नाही.’’

हा प्रसंग झाल्यावर माझ्या मनात पुढील विचार आले, ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना चराचरात ईश्‍वर पहाण्यास शिकवले. साधकांना अन्य संतांनी प्रसाद दिल्यास ते कृतज्ञताभावाने स्वीकारतात. कुठलाही साधक ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी प्रसाद दिला, तरच मी स्वीकारेन’, असे म्हणत नाही. या प्रसंगातून ‘परात्पर गुरु डॉक्टर साधकांना स्वतःच्या देहात अडकू न देता प्रत्येकात देव पहायला शिकवून साधनेत प्रगती करवून घेत आहेत’, हे लक्षात येते.’