Purushottam Relekar's Album: Wall Photos

Photo 1 of 4 in Wall Photos

प्रेम ही अशी भावना आहे जी शब्दातून कधिच व्यक्त होऊ शकत नाही. किंबहुना जगात माझं तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणणारे तर मिळतात पण माझे तुझ्यावर प्रेम का आहे हे शब्दात सांगणे अवघड आहे नव्हे अशक्यच...
प्रेमाला किंवा प्रेमाची व्याख्या कोणीच करू शकत नाही ना कोणीही असं सांगू शकत कि अमुक एका कारणामुळे मी तुझ्यावर प्रेम करतो..! अंहं.. खरोखरच प्रेमाला कारणांची गरज आहे..??
नाही..! नक्कीच नाही..! म्हणूनच..
खरं प्रेम कायम राहते, उडते ती वासना.
प्रेमाचे बंध आयुष्यभरासाठी असतात आणि ते प्रेमाला पुढे नेतात मागे खेचत नाहीत.
बालीश प्रेम म्हणते, मला तुझी गरज आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो.
परिपक्व प्रेम म्हणते, मी तुझ्यावर प्रेम करतो, म्हणून मला तुझी गरज आहे.
खरंतर प्रेम हे कधिच आयुष्यातली कमतरता किंवा अपुर्णता भरून काढण्यासाठी नसते. प्रेम म्हणजे ह्रदयात उमटणारे तरंग असतात.
तुमच्या आयुष्यात कोणी यावं हे तुमच्या नशिबाची रेषा सांगते, पण तुमच्या आयुष्यात कोणी थांबायचं हे तुमचं ह्रदय ठरवतं.
म्हणूनच..
प्रेमकथा महत्वाच्या नसतात, महत्वाचे असते.. तुमच्यातील प्रेम करण्याची क्षमता. कारण प्रेमाला यश अपयश या शब्दात बध्द करता येत नाही, ते चिरंतन असते.