Bhushan zarkhande's Album: Wall Photos

Photo 3 of 3 in Wall Photos

।। १ ।।

भारतवासी रामचंद्र मी तुला जागविण्या आलो।
शत धर्मातील धर्म एक हौतात्म्य जागविण्या आलो।।

आज हिमालय कैद असे तो चिनी बंदीशाळेत।
सामर्थ्याचा देऊ परिचय चला पुन्हा रणभूमीत।।

भारतमाता हाक मारते नरसिंहा तू जागा हो।
बलिदानाची ईर्षा जागे भारतवीरा जागा हो।।

रणभेरी गर्जुनी उठली मोहक निद्रा त्वरीत झडे।
वज्रदंड हा बलिदानाचा देशभक्तीची ध्वजा चढे।।

उत्तरेतल्या सीमेवर आव्हान चीन्यांनी दिले रे।
रणकंकण मनगटी बांधुनी राष्ट्रभक्त हे सजले रे।।१।।

अग्नीपथावर चला वीरांनो शिर तळहाती हे घेऊन।
उष्ण रक्त अभिषेक करूया नरमुंड माळा सजवून।।

खापर घेऊन काली उठली हाती धरण्या नरमुंडा।
रक्त बीज चाखण्या धावली रण भूमीवर चामुंडा।।

नरमुंडांनी सजलेला तो शिव तांडव कैलाशी करी।
घराघरातून गर्जत गर्जत रणचंडी रण जवळ करी।।

रावण वध निर्धार जागवीत घराघरातून राम उठे।
कौरव तितुके ठेचून काढू असे गर्जूनी कृष्ण उठे।।

उत्तरेतल्या सीमेवर आव्हान चीन्यांनी दिले रे।
रणकंकण मनगटी बांधुनी राष्ट्रभक्त हे सजले रे।।२।।

परशु घेऊन राम उठे, श्री रामाचा बाण सुटे।
गांडीव धारी वीर‌ उठे, श्रीकृष्णाचे चक्र सुटे।।

पुरुषार्थाला साद घालण्या, चाणक्याची शेंडी सुटे।
सीमेवरती सेल्युकसाला, लोळविण्या तो चंद्र उठे।।

हलदीघाटी जागी झाली स्वतंत्रतेचा जागे स्वर।
केसरीया विर सजले आणि पद्मीनीचा जागे जौहर।।

दक्षिणेला वीर शिवाजी रक्त शहाजीचे ताजे।
मारीत मारीत मरेन ऐसै हट्टी मरहट्टे राजे।।

उत्तरेतल्या सीमेवर आव्हान चीन्यांनी दिले रे।
रणकंकण मनगटी बांधुनी राष्ट्रभक्त हे सजले रे।।३।।

बर्बर होते अशुद्ध होते शुद्ध तयांना केले कुणी।
युद्ध लादले आम्हावरती बुद्ध तयांना दिला कुणी।।

चाओ, मावो, चीनी, मिनी येऊ दे येतो कोणी।
आज इरेला पडलो आम्ही कोण ठाकले समोरुनी।।

रावळपिंडीवाला असु द्या असेल वा पेकिंगवाला।
ढेर तयांना तिथेच करुया डागूनी तोफांचा गोळा।।

कोण मुढ तो म्हणे आम्हाला चिनी टक्कर देतील रे।
अरे चिनी ती पाण्यामध्ये ढवळुन पिऊन टाकु रे।।

उत्तरेतल्या सीमेवर आव्हान चीन्यांनी दिले रे।
रणकंकण मनगटी बांधुनी राष्ट्रभक्त हे सजले रे।।४।।

मराठी पद्यानुवाद:- रणजित हिर्लेकर

(हि कविता मुळात चित्रपट कलाकार आशुतोष राणा यांनी सादर केलेली हिंदी कविता आहे. त्यातील काही कडव्यांचा मी मराठी पद्यात भावानुवाद केला आहे.)