Shambhu Gopal Prabhu Desai 's Album: Wall Photos

Photo 1,796 of 1,811 in Wall Photos

Tariiff , Trump and Trust !

Mr. Trump your have lost your trustworthiness ! You will not be able to fool Indians by your tactics anymore !

Shame upon you Mr. Trump for your betrayal of Trust reposed in you by the countries whom you cunningly called 'friends' yet pierced a dagger in their back ! You can never make USA great again !
*************************************************
"जगातल्या चौथ्या अर्थव्यवस्थेचा पंतप्रधान राजीनामा देतो म्हणजे काय?"

मी काही जागतिक घडामोडींमधला तज्ज्ञ नाही पण इंटरनेटवरील काही बातम्या वाचून काही डॉट्स कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय.

भारत जपानला मागे टाकून नुकताच जगातील चौथी अर्थव्यवस्था बनलाय. भारतापुढे अमेरिका, चीन आणि जर्मनी आहेत. त्याकडे नंतर येऊयात.

तर, भारताने रशियाकडून तेल घेऊ नये ह्या फुसक्या कारणाने ट्रम्प भारताला कर वाढवण्याची धमकी देत होता. भारताकडून कसलीही प्रतिक्रिया गेली नाही. भारत इतका शांत होता कि ट्रम्प स्वतःच वैतागले आणि भारतावर कर लादायला सुरुवात केली..

\u25c6 ३० जुलै २०२५ - अमेरिकेने भारतावर २५% कर वाढवला. भारताकडून काहीही प्रतिक्रिया गेली नाही.
\u25c6 २६ ऑगस्ट २०२५ च्या आधी अमेरिकेने वाढीव २५% लादण्याची धमकी दिली. भारताकडून काहीही प्रतिक्रिया गेली नाही.
\u25c6 २७ ऑगस्ट २०२५ - अमेरिकेने भारतावर वाढीव कर लादला. भारताकडून काहीही प्रतिक्रिया गेली नाही.

मध्यंतरात भारत काहीच बोलत नाही म्हणून रशियामार्गे दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. तो अमेरिकेच्या अंगलट आला. चीन, भारत आणि रशियाच्या नेत्यांच्या एकत्रीकरणानंतर अमेरिकेने आम्ही भारताला गमावले अशी प्रतिक्रिया आली. आता ट्रम्प परत मोदी एक महान नेते आहेत म्हणून त्यांचे कौतुक करत आहेत. इथं मात्र मोदींनी त्याला प्रतिसाद देत भारत आणि अमेरिकेच्या दृढ संबंधांचा पुनरुच्चार केला. पिरीयड...

जगातील पाचव्या अर्थव्यवस्थेकडे येऊयात. तसं पाहायला गेलं तर जपान आणि भारताची अर्थव्यवस्था जवळपास एकाच पातळीवर आहे.

जपानमध्ये जुलै २०२५ मध्ये जपानचा सत्ताधारी पक्ष जपानच्या वरिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीत विजयश्री संपादन नाही करू शकला. १४१ वरून १२२ पर्यंत खाली आला. भारताप्रमाणेच जपानचे वरिष्ठ सभागृह एवढे महत्वाचे नसते. भारतात बऱ्याचदा राज्यसभेत केंद्रातल्या पक्षाचे बहुमत नसते. तेंव्हा कोणत्याही पंतप्रधानाने राजीनामा दिल्याचे भारतात घडले नाही. पण तसे जपानमध्ये घडले. जुलै मध्ये ही निवडणूक पार पडली आणि जपानच्या ६८ वर्षीय पंतप्रधानाने राजीनामा सप्टेंबरमध्ये दिला आहे, जुलैचे कारण सांगून. कनिष्ठ सभागृहातसुद्धा आघाडीला पूर्ण बहुमत नव्हते. १९९३ पासून पहिल्यांदाच मॅजिक फिगरच्या खूप लांब जपानची एलडीपी (सत्ताधारी पक्ष - लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी) गेली आहे. म्हणजे अस्थिर लोकशाही.

ह्यावर ट्रम्पने टॅरिफचा बॉम्ब टाकला..

\u25c6 ८ जुलै २०२५ ट्रम्पने जपानला आयातशुल्क कमी करण्यासाठी धमकी दिली होती. सेम २५% वाढीव कर.. १ ऑगस्टपासून..
\u25c6 ३१ जुलै २०२५ - जपान गुडघ्यावर. अमेरिकेच्या अटी शर्थी मान्य केल्या गेल्या. टॅरिफ बदलण्यात आले आणि २५% वरून कर १५% वर आले.
\u25c6 ५ सप्टेंबर २०२५ - जपानसोबत अमेरिकेने करार करून १५% ची बेसलाईन मान्य केली.
\u25c6 ७ सप्टेंबर २०२५ - जपानच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला.

जपानच्या अस्थिर राजकीय बाबी सक्षमपणे हाताळणारा प्रधानमंत्री असता तर जपानवर ही वेळ आली असती?

भारतात भाजपला पूर्ण बहुमत नाही परंतु राष्ट्रीय लोकशाही आघाडी मजबूत आहे. मोदींची सर्वांवरची पकड मजबूत आहे. एकाच वर्षात जपानमध्ये प्रधानमंत्र्यांच्या विरोधात कुरबुरी सुरु झाल्या होत्या. ह्या सर्वांचा परिणाम नेतृत्वावर होतोच. जपानने गुडघे टेकले. भारत किंचित पण झुकलेला नाही.

आज अमेरिका नंबर एक वर आहे. पण अशात आयएमएफ, मूडी सारख्यांचे अहवाल अमेरिकेची चिंता वाढवणारे आहेत. ट्रम्पचा टॅरिफवॉर अमेरिकेच्याच जिव्हारी लागलाय. येत्या काळात जे कोणी अमेरिकेची जागा घ्यायची शक्ती बाळगतात त्यांना आधीच नियंत्रणात आणायच्या ट्रम्पच्या ह्या खेळी लपून राहिल्या नाहीत.

अमेरिका आणि चीनमधले टॅरिफवॉर लपून राहिले नाही. चीनने सुद्धा अमेरिकेला कोललेच आहे. अमेरिकेचा जर्मनीवर सुद्धा राग आहे कारण अमेरिकेकडून जर्मनीला शस्त्रास्त्रांची निर्यात कमी होत आहे. जर्मनी रशियाकडून तेल गॅस घेते म्हणून ट्रम्प जर्मनीवर चिडून आहेतच. पण जर्मनी युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्थाअसून ती युरोपियन संघाच्या कायद्याने चालते त्यामुळे सध्यातरी ट्रम्प अख्खा युरोप अंगावर घेऊ शकत नाहीत. भारत तर त्यांना दाणे टाकताना दिसत नाहीये. पण जपानच्या बाबतीत मात्र ट्रम्प यशस्वी झाले. अमेरिकेनंतरच्या तीन जागतिक अर्थव्यवस्था येन केन प्रकारेण हातात घ्यायचा ट्रम्पचा डाव केवळ जपानच्या बाबतीत जरा यशस्वी झालेला दिसतोय. आता जपानच्या अंतर्गत बाबतीत ट्रम्पने ढवळाढवळ केली का? भविष्यात प्रकाश पडेलच..

ट्रम्पच्या उद्याचे स्पर्धक संपवायच्या नादात भारताचे मोदी मात्र जगाच्या क्षितिजावर नव्याने तळपू लागलेत हे मात्र खरं.. तेही आघाडीचे सरकार असताना..

- चेतन दीक्षित
**************************************************
300 Koreans Detained at Hyundai Factory, Japan PM Resigns Over ‘Humiliating’ Trade Deal: How the U.S. Treats Its So-Called Allies

While the Trump administration subjected close allies like the EU, Japan, and South Korea to public humiliation, nations such as India, China, and Russia resisted U.S. pressure and pushed back effectively.

The Trump-era strategy of "bully the allies, humiliate the partners, extract maximum profits, and leave nothing behind" has once again taken its toll—this time on Japan, a key American ally now saddled with a lopsided and burdensome trade agreement that led to the resignation of its prime minister. ( Uday Barad )
***************************************************