लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या आपल्या भारतात सत्तारूढ पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आज 40 वर्ष पूर्ण करून 41 व्या वर्षात पदार्पण केलेय. स्व शामा प्रसाद मुखर्जी, स्व पंडित दीनदयाळजी यांनी जनसंघाच्या लावलेल्या या रोपट्याचे भारतीय जनता पक्षाच्या रूपाने वटवृक्षात निर्माण होऊन 2 खासदारांपासून 303 खासदारापर्यंत पोहचून स्व बळावर देशात सत्तारूढ झाला आहे
या पक्ष विस्तारात सर्व नेते ,कार्यकर्ते यांचा सहभाग मोलाचा आहे
त्याग, सेवा, समर्पण ,विश्वास या भावनेने कार्य करून प्रत्येक कार्यकर्ता हा पक्ष विस्तारासाठी झटत असतो पंडित दीनदयाळजी यांनी मांडलेल्या मानवतावाद आणि अंत्योदय संकल्पनेनुसार कार्य करत असतो त्यानुसारच
आज देशात कोरोनाचे सावट असताना सुद्धा समाजातील शेवटच्या घटका पर्यंत भाजप कार्यकर्ते हे मदत पोचवत आहेत
आज मला अभिमान आहे मी देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या
व सेवाभावी विचारसरणी असलेल्या भारतीय जनता पक्षाची सदस्य असल्याचा आज पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त निवासस्थानी भारत मातेला वंदन करून पक्ष विस्तारात योगदान देणाऱ्या सर्व नेते कार्यकर्ते यांचे स्मरण करून पक्षाच्या ध्वजाचे ध्वजारोहण केले