Shambhu Gopal Prabhu Desai 's Album: Wall Photos

Photo 1,975 of 2,169 in Wall Photos

तुझे नाम आले ओठी

तुझे नाम आले ओठी सुर भारावले l
अंतरंगी बाह्यअंगी मन हरवले || तुझे नाम आले ओठी...

नको झांज चिपळ्या वीणा नको भिन्न राग l
झोपेतही विवेकाला येते आहे जाग रे || तुझे नाम आले ओठी... सुर भारावले...

आनंदाचा डोह मन आनंद किनारा l
विकाराच्या शेवाळ्याला नसे तेथ थारा रे || तुझे नाम आले ओठी... सुर भारावले...

भाव अंतरीचे हळवे जसे जुई फुलं स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भुल रे || तुझे नाम आले ओठी.. सुर भारावले...

गायक- अजित कडकडे