Shambhu Gopal Prabhu Desai 's Album: Wall Photos

Photo 1,976 of 2,169 in Wall Photos

आली कुठूनशी कानी....!

आली कुठूनशी कानी टाळ-मृदुंगाचि धुन
नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोमरोमातुन

नभी तेजात नाहली चंद्रप्रभा चंद्रायणी l
बोले शब्देवीण काही चंद्रासवे इंद्रायणी
इंद्रायणीच्या पाण्यात शहारले अंग अंग
मन झाले ओले चिंब जैसे भिजले अभंग ।।

वृक्ष दिसला सामोरी काय सांगू त्याची शोभा ।
जसे कटिवरी हात युगे अठ्ठावीस उभा ।
भूक नयनांची सरे मूक वाचा ये रंगात ।
माझा देह झाला देहू तुकयाच्या अभंगात